विशेष पोस्ट
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेते मा.सदानंद शेट्टी यांनी पुणे ते मेंगलोर विमान सेवा त्वरित चालू करण्य़ाची मागणी केली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी #मा.सदानंद कृष्णा शेट्टी यांच्या निवासस्थानी आज कर्नाटकचे भारतीय जनता पार्टीचे खासदार #मा.नलनीकुमार ,आमदार #मा.राजेश नाईक तसेच मुंबईचे प्रसिद्ध व्यापारी #मा.नगरीकुत्तू विवेक शेट्टी यांनी आज समक्ष भेट दिली त्यानिमित्त त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले सदर प्रसंगी कार्यक्षम नगरसेविका
#मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी; अश्विनी मित्र मंडळाचे अध्यक्ष #मा.सिद्धांत सदानंद शेट्टी उपस्थित होते याप्रसंगी मा.सदानंद शेट्टी यांनी कर्नाटकचे खासदार मा.नलनीकुमार यांना पुणे ते मेंगलोर विमान सेवा त्वरित चालू करण्यात यावी अशी मागणी केली, त्यांच्या विनंतीला मान देऊन यांनी देखील लवकरात लवकर सेवा चालू करू असे सुचित केले.