मराठी

राष्ट्रीय एकतेसाठी धावले नगरकर

अहमदनगर प्रतिनिधी विलास गिर्‍हे: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज, गुरुवारी राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने “राष्ट्रीय एकता दौड” चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह मोठ्या संख्येने नगरकरांनी यात सहभाग घेतला.

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, अहमदनगर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या द्वारा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व सर्व स्तरातील जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी या दृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करावयाचा निर्णय केंद्र शासनाने घेतला? त्यानिमित्त आज एकता दौडचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी असिमा मित्तल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक पराग नवलकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जून, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, कबड्डीपटू अंजली वलाकट्टी, अमोल बागूल आदींची उपस्थिती होती.
पोलिस यंत्रणा, राष्ट्रीय छात्र सेना, भारत स्काऊट गाईड, माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था ,स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळ व क्रीडा संस्था आदी या एकता दौडमध्ये सहभागी झाले होते.
जिल्हा क्रीडा संकुल ,वाडिया पार्क येथून रॅलीला प्रारंभ झाला. ही एकता दौड टिळक रोड मार्गे गंगाधरशास्त्री गुणे चौक -आयुर्वेद महाविद्यालय- भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल – जुनी महापालिका इमारत- सब जेल चौक- चौपाटी कारंजा -दिल्ली दरवाजा- सिद्धिबाग- पोलीस परेड मैदान अहमदनगर येथे या एकता रॅलीचा समारोप झाला.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button