मराठी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्याचा खून … मृतदेह आणि मोटार जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न !

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, २८-५-२०२१.
(दि. २६मे) :
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते धामणी (ता. आंबेगाव) सचिन राजाराम जाधव (वय ४२.) यांचा खून करून मृतदेह आणि मोटार जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. ही घटना मंगळवारी (दि. २५.) रात्री पोंदेवाडी येथे घडली. व्यवसायाच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

याबाबतची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी पाच ते सहा तासांच्या आत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंचर येथे बुधवारी (दि. २६) रात्री ही माहिती दिली. अधिक माहितीनुसार, धामणी येथील सचिन राजाराम जाधव मंगळवारी रात्री घरी न आल्याने त्यांचा पुतण्या रोहन जाधव यांनी मंचर पोलिस ठाण्यात त्याबाबत तक्रार दिली.

पोंदेवाडी-काठापूर रस्त्यालगत एका ठिकाणी बुधवारी सकाळी नागरिकांना रक्ताचे शिंतोडे, चपलांचा जोड, कंगवा आढळून आला. स्थानिकांनी तत्काळ ही माहिती पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज यांना दिली. याची माहिती मिळताच पोलिसांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी अनिल लंबाते, निरीक्षक सुधाकर कोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. खून झाल्याचा प्राथमिक अंदाज धरून तपास वेगाने फिरवला. यात पोलिसांना जाधव यांच्या व्यवसायाची माहिती मिळाली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button