जागतिक परिचारिक दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तील सौ.उषाताई भोसले, हरणांचा सन्मान- श्री भाग्यदेव घुले

*
संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, १३-५-२०२१.
आज दिवसंदिवस कोरोना रोगाची समस्या भेडसावत असताना सुद्धा जीवाची पर्वा न करता,रुग्ण सेवेला प्राधान्य देत त्या रुग्णांची सेवा करत आहेत,आज १७ वर्ष ते नियमित वैद्यकीय क्षेत्रात आपले काम व येणाऱ्या रुग्णांना ची समस्या जाणून घेऊन त्यांना होईल तेवढी मदत करून एक माणुसकीच्या माध्यमातून सहकार्य करत आहेत.कधी कधी आरोग्य यंत्रणेतील नियोजनाच्या अभावामुळे किंव्हा त्रुटीमुळे काम करत असताना नर्सेसना खूप शाररिक मानसिक त्रासाला सामोऱ्या जावे लागत आहे.
अपुरा कर्मचारी वर्ग,अपुरी साधन सामग्री,अपुरा लोकसहभाग,अपुरे अनुदान,असमान आरोग्य वितरण प्रणाली,योग्य वेळी माहिती न मिळणे,इत्यादिमुळे वाढलेले कामाचे तास,सतत ताणतणाव, असताना सुद्धा वेळेत वेळ काढून कित्येक रुग्णाचे प्राण वाचून त्यांना जीवनदान देणाऱ्या उषाताईच्या कार्यला मी मनापासून
कृतन्यता व्यक्त करतो व ताई तुमच्या कार्याला सलाम कोरोनाच्या या महामारीत सामाजिक बांधिलकी जपत अनेक रुगणांची वाढीव बिले आपल्या सांगण्यावरून व आपल्या संघर्षातून कमी करण्यात आली.व आपल्या माध्यमातून गोरगरीब जनतेला खूप खूप सहकार्य झाले.
आपल्याकडून असेच समाज कार्य घडत राहो ही भगवंतां चरणी प्रार्थना..
परिचारिका दिनाच्या निमित्ताने आज यशवंतराव चव्हाण;रुग्णालयात तील उषाताई भोसले, ह्याचा आरोग्य प्रतिक तुळशी रोप देऊन सन्मान करण्यात आला सर्व डॉक्टर व नर्सेस ताई ना खुप खूप शुभेच्छा देण्यात आल्या त्या वेळी श्री. भाग्यदेव एकनाथ घुले, (शहराध्यक्ष-पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन पिंपरी चिंचवड शहर) हरी ॐजेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. नामदेव गोगावले, दत्तात्रय बाळु घुले, अशोक वहिले, नामदेव मोरे, रोहिदास जोशी, दत्ता घुले, दिलीप घुले, नंदु घुले, नामदेव गोळे, उपस्थित होते.