श्री युनुस पठाण यांचा करोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनी मदतीचा हात

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
पुणे थेरगाव
बिर्ला हॉस्पिटल मध्ये 72 वर्षाची महिला कोरोना पॉझिटिव्ह मृत्युमुखी झाली माझा मित्र मरीबा गणगे,संत ज्ञानेश्वर कॉलनी त्यांचा मला (युनूस रशीद पठाण महाराष्ट्र सचिव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल)फोन आला त्या महिलेचा हॉस्पिटलचं बिल 191000 आल त्यानंतर त्यांचा नातू पॉझिटिव्ह घरकुल मध्ये ऍडमिट असता त्यांचे नातेवाईक मला फोन केला व सांगितले की अगोदरच आपण 91 हजार रुपये भरले आहेत व त्यानंतर आजीचा मृत्यू झाला व 91 हजार रुपये बिल बाकी आहेत असे मला समजताच मी बिर्ला हॉस्पिटलमध्ये धाव घेतली व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना रात्री साडेबारा वाजता फोन केला,त्यांनी मला सांगितलं सकाळी आमची टीम येईल व टीम येऊन योग्य पडताळणी करून बावीस हजार रुपये कमी करून 64000 बाकी भरणा केल्यावर मृतदेह ताब्यात घेऊन ते मृतदेह अंत्यविधी करण्यासाठी पिंपरी लिंक रोड येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी जाती धर्मानुसार विधी करण्यात आली.