दुर्घटना घडण्याआधी महावितरणने लक्ष देत डिपीच्या झाकणांची दुरुस्ती करुन बंद करावे श्री युनुस पठाण यांची मागणी

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
प्रभाग क्रमांक 23 थेरगाव येथील धनगर बाबा मंदिरा मागील एकता कॉलनी व समता कॉलनीच्या मधोमध धोकादायक उघडी डीपी अपघाताला निमंत्रण देत आहे. दुर्घटना घडण्याआधी महावितरणने लक्ष देत डिपीच्या झाकणांची दुरुस्ती करुन बंद करावे अशी मागणी रहिवाशी करीत आहेत .या रस्त्यावर नेहमी माणसांची वर्दळ असते तसेच लहान मुले येथे खेळत असतात. या उघड्या डीपीतील वीजतारा देखील खाली लोंबल्या आहेत. खेळता खेळता मुले डीपीला धरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच सध्या पावसाचे दिवस असल्याने वीज प्रवाह उतरू शकतो त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्या आधी या डिपीसह परिसरातील अन्य डिपींच्या देखभाल दुरुस्तीची कामे करून रहीवांशना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेलचे प्रदेश सचिव युनुस पठाण यांनी मागणी केली आहे