रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडीच्या अध्यक्ष पदी श्री.सचिन खोले, व सेक्रेटरी पदी सौ वनिता सावंत, यांची निवड

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक १३-७-२०२१.
रोटरी वर्ष २०२१-२२ साठीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यांचा पद्ग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी ही संस्था गेली अनेक वर्षे पवना नदी संवर्धन, निसर्ग, पर्यावरण आणि जल संवर्धन या विषयावर काम करत असून अध्यक्ष पदी सचिन खोले आणि सचिव पदी वनिता सावंत यांची निवड करण्यात आली.आज मावळते अध्यक्ष रो.श्री.सचिन काळभोर यांनी रो.सचिन खोले व रो.वनिता सावंत यांना पुढील कार्यभार सोपविला
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून . पंकज शहा, डिस्ट्रिक गव्हर्नर डिस्ट्रिक्ट ३१३१ तसेच AG बलवीर चावला आणि AGA सत्यजित उंब्रजकर उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्ष सचिन खोले यांनी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी येणाऱ्या काळात समाजाच्या उन्नतीसाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिक जोमाने कार्य करणार असून पवना नदी स्वच्छता अभियाना सोबतच प्लास्टिक मुक्ती, प्रदूषण मुक्ती, ट्राफिक समस्या व समाधान,हॅपी व्हिलेज, निराधार आणि वंचितांसाठी मेडिकल प्रोजेक्ट आणि मेंबरशिप डेवलपमेंट अशा विविध उपक्रमावर भर देणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed