पिंपरी-चिंचवड शहराच्या सिमेवरील मोशी टोलनाका आजपासून बंद; वाहनचालकांना मोठा दिलासा

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१०-१०-२०२१
पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवरील मोशीतील टोलनाका आज (शनिवार) पासून बंद झाला आहे. मुदत संपल्याने आयआरबी कंपनीने शुक्रवार दिनांक,९.रात्री१२. वाजल्यापासून टोल वसुली बंद केली. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतूक कोंडीतून सुटका झाली.
मोशीतील टोल नाक्यावर जुन्नर, खेड, आंबेगाव, आदी ग्रामीण भागातून शहराकडे, तर पिंपरी-चिंचवड, पुणे शहराकडून चाकण, औद्योगिक परिसराकडे जाणार्‍या वाहनचालकांना टोल भरण्यासाठी थांबावे लागत होते. औद्योगिक परिसरातील मालाची वाहतूक करणारी जड वाहने या मार्गावरून जात होती. वाहनांची मोठी वर्दळ होती. टोल नाक्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती.

मोशीतील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागत होत्या. त्यामुळे रांगेमध्ये बराच वेळ थांबावे लागत असल्याने वाहनचालकांना वेळेचा आणि इंधनाचा फटका बसत होता. टोल नाक्याची मुदत संपली आहे. त्यामुळे टोल वसुली दिनांक,९.रात्री १२.वाजे पासून बंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed