मराठी
जगातील सर्वांत उंच ‘भगवा ध्वज’ उभारण्याचा आमदार श्री.रोहित पवार, यांचा संकल्प, मुहूर्तही ठरला
संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,१०-९-२०२१.
आमदार श्री. रोहित पवार, यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून श्री. रोहित पवार, यांनी परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प केला आहे.
जगातील सर्वांत उंच ‘भगवा ध्वज’ उभारण्याचा श्री. रोहित पवार, यांचा संकल्प, मुहूर्तही ठरला,
महाराष्ट्राच्या पावन भूमीत देशातील नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज उभारणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आमदार श्री.रोहित पवार, यांच्या संकल्पनेने लोकसहभागातून आणि सहकार्यातून ‘स्वराज्य ध्वज पूजन यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.