मराठी

पिंपरी-चिंचवड मधिल कामांची वाटचाल मंदगतीने आमदार मा.लक्ष्मण जगताप, यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती आणि कानउघाडणी

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२७.१०.२०२१.
पिंपरी, – चिंचवड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांची आमदार मा.लक्ष्मण जगताप, यांनी सोमवारी (दि. २५) महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. अनेक ठिकाणी संथगतीने कामे सुरू असल्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करा. विशेषतः खोदकाम केलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

आमदार मा.लक्ष्मण जगताप,यांच्या पिंपळेगुरव, येथील जनसंपर्क कार्यालयात ही बैठक झाली. महापौर माई ढोरे, व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे सर्व नगरसेवक तसेच महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील, यांच्यासह स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता या बैठकीला उपस्थित होते.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button