मराठी

चिंचवड मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप सरसावले; प्रत्येक प्रभागात मोफत बाह्यरूग्ण तपासणी व मोफत औषधांचे वाटप करणार

संवाददाता, तानाजी केदारी,महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१५-६-२०२१
आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रत्येक प्रभागात “अटल प्रभाग आरोग्यालय योजना” राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक प्रभागातील नागरिकांची मोफत बाह्यरुग्ण तपासणी व मोफत औषधांचे वाटप केले जाणार आहे. प्रभाग क्रमांक २२, काळेवाडी येथे महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १४) या योजनेला सुरूवात करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप हे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. महाआरोग्य शिबीर असो की राज्य व केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजनामार्फत आमदार जगताप यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. विविध आरोग्य उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी शहरातील अनेक गरजू रुग्णांना मोठ्या आजारांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने आर्थिक नियोजन कोलमडलेल्या सामान्य नागरिकांना आरोग्य दिलासा देण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात “अटल प्रभाग आरोग्यालय योजना” राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button