महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खेळाडूंसाठी ही ‘खेलो इंडिया ‘ केंद्र स्थापन करण्याची आमदार लक्ष्मण जगताप यांची मागणी

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१०-६-२०२१.
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी चिंचवडकरांच्या आरोग्यासाठी नेहमीच अग्रभागी असतात, शहरातील उद्याने, व्यायामशाळा, ओपन जिमच्या माध्यमातून तसेच कोरोनाच्या संकट काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ऑनलाईन शिबीरे घेऊन त्यांनी शहरातील नागरिकांचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला आणि आजही ते तो करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडापटूना योग्य मार्गदर्शन मिळावे, आणि शहराचा नावलौकिक वाढवा याकरिता त्यांनी किरेन रिजीजु केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा शासन मंत्री, नवी दिल्ली यांना पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महानगरात ‘खेलो इंडिया’ केंद्र सुरू करणे बाबत मागणी करणारे निवेदन दिले आहे.

या निवेदनात ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांनी म्हटले आहे की, क्रीडा मंत्रालयाने देशातील सात राज्यातील खेळाडूंसाठी १४३ समर्पित ‘खेलो इंडिया’ केंद्रे मंजूर केली आहेत. या केंद्रासाठी सरकारने १४.३० कोटी रुपये मंजूर केले आहेत. देशाच्या इतर भागांप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातही हजारो खेळाडू विविध खेळांमध्ये भाग घेत आहेत. आमच्या शहरातील खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दर्शविले. पिंपरी-चिंचवड महानगर येथे खेळाची कौशल्ये, कौशल्य आणि क्षमता ओळखून व लहानपणापासूनच खेळाचे कौशल्य असलेल्या मुलांचे मूल्यांकन करून चांगल्या खेळाची उपकरणे, सुविधा तसेच उत्तम प्रशिक्षण पुरविणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *