रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी सरसावले … पिंपळे गुरव, मधील ‘इंग्रेसिया’ सोसायटीचे सभासद.

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, १०-५-२०२१.
: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सर्वत्र ऑक्सिजन, रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. याचे भान ठेवून पिंपरी-चिंचवड, महानगर पालिकेच्या हद्दीतील पिंपळे गुरव मधील ‘इंग्रेसिया’ सोसायटीच्या सभासदांनी जहांगीर हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले. शिबिरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराला माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, नगरसेवक शशिकांतआप्पा कदम, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष सागर अंगोळकर ,यांनी भेट देऊन सोसायटीच्या सभासदांच्या या समाजकार्याचे कौतुक केले, आणि प्रशस्तीपत्रक देऊन रक्तदात्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच या सोसायटीचा आदर्श शहरातील इतर सोसायटीच्या सभासदांनी घ्यावा असे आवाहनही उपस्थिताच्या वतीने करण्यात आले.