मराठी

कष्टकऱ्यांच्या मदतीला धावले मातोश्री सामाजिक संस्था पिंपरी चिंचवड शहर*

संवाददाता सौ.पार्वती ढोणे महाराष्ट्र राज्य प्रभारी.
पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी. काळेवाडी फाटा. वाकड. थेरगांव. पिंपरीगांव. तापकिर मळा. रहाटणीगांव. परिसरातील घरोघरी केले धान्याचे वाटप…

पिंपरी (दि. ३० ) – करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरु झाल्याने नागरिक कुटुंबासहीत घरातच आहेत. पण मजूरी करुन दररोज आपली उपजिविका भागवणारे कष्टकरी हे घरीच असल्याने कुटुंबाची उपजिविका भागवण्यासाठी हतबल झाले आहेत. मातोश्री सामाजिक संस्थेच्या संस्थापक *अध्यक्ष श्री. गणेश आहेर* यांनी सोशल डिस्टनसिंगची काळजी घेत संपूर्ण परिसरात घरोघरी धान्याचे वाटप केले.

या उपक्रमाबाबत माहिती देत गणेश आहेर म्हणाले की, कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आले आहे व त्याचा वाढता संसर्ग रोखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मा. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी व मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांनी देशासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील हातावर पोट असणऱ्यांची संख्या खुप मोठी आहे.

घरातील राशन अल्प असल्यामुळे या कष्टकऱ्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे . परंतु, अशा स्थितीत एकमेकांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहर माझ्या कुटुंबासारखेच आहे व त्यामुळे अन्नधान्याचे वाटप केले.

अन्न-धान्याचा पुरवठा नियमितपणे होणार असला तरी, तो खरेदी करण्यासाठी कष्टकऱ्यांच्या घरात पैसेच नाहीत,

अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. संकटाच्या या परिस्थितीत ज्यांना शक्य आहे त्यांनी यथा शक्ती मदत करावी असे *आवाहन मातोश्री सामाजिक संस्था पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अध्यक्ष श्री.गणेश आहेर.श्री. नवनाथ (माऊली) जाधव. श्री.गणेश पाडूळे. श्री.
गोरख पाटील. श्री.निलेश भोरे.श्री. रविकिरण घटकार. श्रीमती शिल्पाताई आनपण. श्री.संजय गायके. श्री
बाळासाहेब गायकवाड. श्री.नरसिंग माने. श्री.आधिकराव भोसले. श्री.गणेश वाळूंज. श्री.मारुती म्हस्के. श्री.दत्ता गिरी. यांच्या वतीने करण्यात येत आहे

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button