मास्टर माईंड इंग्रजी माध्यम पुणे* *सेवा शुल्क मध्ये सुट मिळावी म्हणून शिवसेना यांचे शाळेच्या व्यवस्थापना यांना पत्र

संवाददाता सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,९-६-२०२१.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मास्टर माईड इंग्रजी माध्यम पुणे. शाळेच्या सेवा शुल्क मध्ये सुट मिळावी. यासाठी इयत्ता १ ली ते १० वी विद्यार्थ्यांचे पालक यांनी आज शाळेच्या व्यवस्थापना कडे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या वतीने विनंती पञ देण्यात आले. सध्याच्या कोरोना काळात पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अनेकांच्या रोजी -रोटी प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगारावर गदा आली आहे. यासाठी अनेक पालकांच्या मागणीवरुन हे निवेदन देण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका स्वरूपा खापेकर, पिंपरी विधानसभा संघटिका सरिताताई साने, शैलाताई निकम, सामाजिक कार्येकर्त्या सुषमाताई शेलार, शिवसेना उपशहर प्रमुख विजयराज साने, विभाग प्रमुख चेतनदादा शिंदे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व पालक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *