मराठी

कोल्हापूरातील शहीद* *जवानाच्या घरात आमदार** *महेश लांडगे,* *यांचे रक्षाबंधन

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२३-८-२०२१.
कोल्हापूर जिल्ह्यात बहिरेवाडी, गावातील ऋषिकेश जोंधळे, हा जवान पाकिस्तान सीमेवर लढताना जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरापूर्वी धारतीर्थी पडला. भाऊबीजेच्या दिवशीच त्यांचे पार्थिव पाहण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्या बहिणीवर आली. ऐन दिवाळीत घरातील एकुलता एक मुलगा व या बहिणीचा एकुलता एक भाऊ जोंधळे, कुटुंबियांनी गमावला. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र गहिवरला होता. पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार श्री. महेश(दादा)लांडगे,यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा एक छोटासा प्रयत्न करत शहीद जवान ऋषिकेश, यांची बहीण कु. कल्याणी रामचंद्र जोंधळे, हिच्या आयुष्यात असणारी भावाची पोकळी भरुन काढण्याचा मानस करत यावर्षीचे रक्षाबंधन बहिरेवाडी, येथे जोंधळे, कुटुंबियासोबत साजरा करण्याचा संकल्प आमदार लांडगे, यांनी केला आहे. संगमनेरच्या साकुर येथील बिरोबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाकिस्तान सैन्याने ऐन दिवाळीत जम्मू काश्मीर येथील सीमेवर दि. १३ नोव्हेंबर २०२० रोजी गोळीबार केला होता. त्याला प्रत्त्यूत्तर देताना ऋषिकेश जोंधळे, गंभीर जखमी झाले होते, त्यात त्यांना वीरमरण आले होते. यापूर्वीही प्रतिक यलगर यांनीही सीमेवर हौतात्म पत्करले होते. बहिरेवाडी, गावातील युवकांनी संपूर्ण महाराष्ट्राला देशाप्रती बलिदान देण्याचा आदर्श घालून दिला आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button