राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी … सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका

संवाददाता,तानाजी केदारी,महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२६-६-२०२१.
राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही कारण त्यांना भीती होती की जर आरक्षणाने मुलं शिकली सवरली, मोठी झाली तर आपल्या मांडीला मांडी लावून बसतील. प्रस्थापित राजकीय मराठे आणि विस्थापित मराठे अशी मोठी लढाई आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत,यांनी केली. मराठा आरक्षणावरुन त्यांनी ठाकरे सरकावर तोफ डागली.
राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण…
राज्यातील राजकीय प्रस्थापित आणि विस्थापित असे मराठयांचे दोन प्रकार पाडले गेले आहेत. प्रस्थापित राजकीय मराठयांना विस्थापित गरीब मराठ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. कारण ते जर एसपी, कलेक्टर, डीसीपी, तहसीलदार झाले तर ते शेजारी बसून जेवतील, आपल्या मांडीला मांडी लावून बसतील. आपल्याशी बरोबरी करतील. राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी याच भीतीतून मराठा समजाला आरक्षण दिले नाही, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केलाय. ते बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी संवाद साधला.