मराठी

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन

अहमदनगर प्रतिनिधी :— विलास गिर्‍हे
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 34 वा पदवीप्रदान समारंभ शुक्रवार दि. 5 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 11.05 वा. आयोजीत केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. भगत सिंग कोश्यारी, महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य आणि कुलपती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे भूषविणार आहेत. दीक्षांत भाषण मा. प्रा. रमेश चंद, सदस्य, निती आयोग आणि 15 वा वित्त आयोग करणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पदवीप्रदान समारंभात 52 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 308 विद्यार्थ्यांना पद्व्युत्तर पदवी व 4707 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 5067 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत तसेच 33 सुवर्ण पदके आणि दोन रौप्य पदके यशस्वी स्नातकांना प्रदान करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात मा. राज्यपाल कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र येथे आयोजित कृषि प्रदर्शनास भेट देतील अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव श्री. सोपान कासार यांनी दिली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button