मराठी

महात्मा फुले कृषि विद्यापीठात डिजिटल विपणनाचे ऑनलाइन प्रशिक्षण संपन्न

अहमदनगर प्रतिनिधी/ विलास गिर्‍हे
डिजिटल विपणनाच्या ऑनलाइन प्रशिक्षणामुळे उद्योजकतेला नवीन चालना मिळेल आणि या लॉक डाऊन काळात सुद्धा विपणन शक्य होऊ शकते. आपल्या उत्पादनाची इंटरनेटच्या विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जाहिरात करणे आणि मार्केट मिळविणे शक्य असल्याचे प्रतिपादन ऑनलाइन प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले.
जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद ;नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डॉ अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे डिजिटल विपणन शास्त्राची मूलभूत तत्वे या विषयावर एका आठवड्याचे ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी. विश्वनाथा बोलत होते. यावेळी ऑनलाइन प्रमुख उपस्थिती मध्ये प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक आणि या प्रशिक्षणाचे निमंत्रक डॉ.सुनील गोरंटीवार, या प्रशिक्षणाचे प्रमुख प्रशिक्षक पुणे येथील डिजिटल मार्केटिंग चे सल्लागार श्री स्वप्निल खर्डे, या प्रशिक्षणाचे आयोजक डॉ. मुकुंद शिंदे, कृषी महाविद्यालय धुळे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे या प्रशिक्षणाचे सहनिमंत्रक डॉ.अतुल आत्रे उपस्थित होते.
कुलगुरूंनी या वेळी महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या व पुढे म्हणाले या कोरोनो संकटाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण देश लॉक डाऊन असताना देखील कृषी विद्यापीठाचे काम ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे .या परिस्थितीत सुद्धा ऑनलाईन प्रशिक्षण व शिक्षण सुरू आहे ही एक आनंदाची बाब आहे. कास्ट-कासम प्रकल्पाने कृषी विद्यापीठात प्रथमच ऑनलाईन प्रशिक्षनाची मालिका सुरू केली असून हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. या जगासमोर कोरोना चे मोठे संकट उभे ठाकले आहे. या परिस्थितीत सर्वांनी घरी थांबावे, स्वच्छता राखावी, विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.या वेळी प्रमुख प्रशिक्षक श्री स्वप्नील खर्डे म्हणाले या लॉक डाऊन काळात आपल्याला डिजिटल मार्केटिंगची ताकत कळाली आहे. पुढील युग हे डिजिटल आणि स्मार्ट असणार आहे. म्हणून सर्वांनी डिजिटल साक्षर व्हावे व डिजिटल मार्केटिंगचा आपण फायदा घ्यावा असे आवाहन केले.
या प्रशिक्षणामध्ये विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले यामध्ये श्री स्वप्नील खर्डे, श्री गौरव , पूर्वेश दिवान आणि जितेंद्र भंडारी यांनी डिजिटल मार्केटिंगच्या विविध विषयांवर ऑनलाईन व्याख्याने दिले आणि प्रात्यक्षिके घेतली.या मध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय,डिजिटल मार्केटिंग साठी सोशिअल मीडियाचा (सामाजिक माध्यमे)वापर, इ-मार्केटिंग, मार्केटिंग साठी गूगल, युट्युब ,फेसबुक चा वापर इ. विषयांचा समावेश होता.
ऑनलाईन प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. उल्हास सुर्वे यांनी मानले.
या प्रशिक्षणासाठी जग भरातून 70 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या मध्ये अमेरिका, देशातून दिल्ली, बिकानेर, ग्वालियर आणि महाराष्ट्र राज्यातून शास्त्रज्ञ अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी प्रशिक्षणासाठी सहभागी झाले होते.या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या नियोजनासाठी सह-संशोधक डॉ. वैभव मालुंजकर आणि इ. मोसीन तांबोळी यांनी योगदान दिले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button