महाराष्ट्र* *पूरग्रस्तांना तातडीने अन्न, कपडे, औषधांची मदत करावी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२७-७-२०२१.
मुंबई :: , पूरग्रस्तांना तातडीने अन्न, कपडे, औषधांची मदत करावी.अतिवृष्टी आणि धोक्याची पातळी ओलांडून वाहणाऱ्या नद्यांमुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली या भागाला जोरदार तडाखा बसला आहे. या भागाची पाहणी करण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निघाले होते. मात्र कमी दृश्यमानतेअभावी त्यांचे हेलिकॉप्टर कोयना हेलिपॅडवर उतरू शकले नाही. ते पु्न्हा पुणे विमानतळाकडे परतले आहेत. असे असले तरी त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले आहेत
.काही भागात तीन ते चार दिवस पाणी साचून राहिल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अद्याप या भागातील पाणी पूर्णपणे ओसरलेले नाही, हवामानाचासुद्धा अडसर आहे. त्यामुळे काळजीपूर्वक बचाव कार्य करावे तसेच कोविड प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने वैद्यकीय पथकांना योग्य त्या सूचना द्याव्यात. या आपत्तीमुळे कोविड रुग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका असेही त्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले आहे.