महाराष्ट्र* *राज्यातील प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

संवाददाता,तानाजी केदारी,महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२७-७-२०२१.
सांगली : तळीये गावात मोठा फटका बसला आहे. साताऱ्यातील आंबेघर आणि मिरगावातही मोठं नुकसान झालं आहे. वायूदलाकडून अन्नाची पाकिटं वाटली जात आहे. नुकसानाचे पंचनामे अजून झालेले नाहीत. पाणी कमी झाल्यावर नुकसानाचा भाग अजून वाढणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे सुरुच ठेवण्याचे आदेश दिले, आहेत,राज्यात महापुरानं थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर यांनी आज सांगली जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली,

सांगलीच्या शिराळा, वाळवा, आणि पलूस, भागात मोठं नुकसान झालं आहे. कोल्हापूर, रायगड, सांगली, इथं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन पाहणी करणार आहेत. अनेक भागात रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरड प्रवण क्षेत्रात येणारी गावं यावेळी वाचली. मात्र, इतर ठिकाणीच दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed