महाराष्ट्र* *पूरग्रस्तांना राज्यसरकारकडून मोफत अन्न-धान्य वाटप.

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२६-७-२०२१.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे आणि या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती, आणि रस्ते वाहून गेले आहेत. आपत्तीग्रस्त भागात मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. याबाबत आज तातडीने आदेश काढण्यात येणार असून आदेशाची वाट न बघता तातडीने मदत कार्य सुरु करण्यात यावे असे यावेळी श्री.छगन भुजबळ, यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत,
पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्यसरकारकडून मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, यांनी आज नाशिक येथे कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
तर काही ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. अशा अतिवृष्टीचा फटका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी लढताना राज्यसरकार हे खंबीरपणे जनतेच्या पाठीमागे उभे आहे.