मराठी

मा. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा ३५वा पदवीदान समारंभ मा.खा. श्री. शरद पवार आणि मा.ना. श्री. नितीन गडकरी यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानीत करण्यात येणार

अहमदनगर प्रतिनिधी , (विलास गिर्‍हे )
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा ३५वा पदवीदान समारंभ गुरुवार दि. २८ऑक्टोबर, २१ रोजी सकाळी ११.०० वा. आयोजीत करण्यात आला आहे. कृषि विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार सभागृहामध्ये ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने होणार्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती श्री. भगतसिंह कोश्यारी असणार आहेत. यावेळी कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषि मंत्री श्री. दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्र सिंह राठौड हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असून ते दीक्षान्त भाषण करणार आहेत. यावेळी या समारंभासाठी विद्यापीठाचे विद्यापीठ कार्यकारी आणि विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी केंद्रीय कृषि मंत्री खासदार श्री. शरद पवार आणि रस्ते, वाहतूक आणि परिवहन खात्याचे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांना कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानीत करण्यात येणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली.
पदवीदान समारंभात दोन वर्षातील विविध विद्याशाखांतील एकुण ११हजार ४६८स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहेत. त्यात विविध विद्याशाखातील १०हजार ७३६ स्नातकांना पदवी, ६२८ स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर १०४स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले जाईल. यावेळी यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समारंभात केवळ पारितोषिकेप्राप्त स्नातक व आचार्य पदवी स्नातक यांनाच प्रत्यक्ष मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अन्य स्नातकांना संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन पध्दतीने अनुग्रहित करण्यात येणार आहे. पदवीदान समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या यु-ट्युब चॅनेल तसेच झुम लिंकवरुन केले जाणार आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button