राज्यात आणखी इतक्या दिवसाने लॉकडाऊन वाढणार … राजेश टोपे, यांचे सुतोवाच

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक.२९-५-२०२१.
राज्यात आणखी १५.दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे. राज्यात १५.दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, असं सुतोवाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांनी केलं. त्यामुळे १.जूनपासून पुन्हा १५.दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे, यांनी पत्रकारांची संवाद साधताना हे सुतोवाच केलं.
राज्यातील पॉझिटिव्ही रेट १०,टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर गो स्लो गेलं पाहिजे. त्यामुळेच १५.दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे. तसेच गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं.