मराठी

लंडनमधील डॉ.आंबेडकर स्मारकात केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंनी नामांतर दिन केला साजरा

लंडन दि.15 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मधील किंग हेन्री रोड वरील स्मारकात जगभरातील आंबेडकरी अनुयायी येऊन नतमस्तक होतात. हे स्मारक रहिवासी क्षेत्रात असल्याने शांतता भंग होत असल्याची स्थानिकांनी तेथील पालिकेकडे तक्रार करून या स्मारकावर आक्षेप घेतला होता. ते आक्षेप दूर करून स्थानिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी भेटण्यासाठी तसेच लंडनच्या सेंट्रल गव्हरमेन्ट ऑफ द युनायटेड किंगडम सरकारने हे आक्षेप दूर करून डॉ आंबेडकर स्मारकाची मान्यता अधिकृत करावी या भारताच्या मागणीचा पाठपुरावा करून माहिती घेण्यासाठी केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले तीन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर आले आहेत. त्यासाठी लंडनमधील भारताचे उच्चायुक्त घनश्याम यांच्याशी ना रामदास आठवले यांनी चर्चा केली. हेन्री रोड वरील डॉ आंबेडकर स्मारकावर स्थानिकांनी घेतलेल्या आक्षेपाचा प्रस्ताव स्थानिक महापालिकेने लंडन सरकारकडे पाठविला असल्याची माहिती उच्चायुक्तांनी ना. रामदास आठवलेंना दिली. रहिवासी क्षेत्रात स्मारक असल्याने शांतता भंग होत असल्याचे आक्षेप लंडन च्या सेंट्रल गव्हरमेन्ट ने रद्द करावेत व कायदेशीर अधिकृत मान्यता डॉ आंबेडकर स्मरकास द्यावी अशी भारताची मागणी असून त्यासाठी लंडन मधील भारतीय उच्चायुक्तांमार्फत प्रयत्न करीत असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी दिली आहे.
केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले तीन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर आले असून पहिल्याच दिवशी दि.14 जानेवारीला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 26 वा वर्धापन दिन लंडन मधील डॉ आंबेडकरांच्या स्मारकात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी साजरा केला.

नामांतराच्या 26 व्या वर्धापनदिनी लंडनमधील आंबेडकर स्मारक येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास ना . रामदास आठवलेंनी अभिवादन केले. महाराष्ट्रातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा लढा हा आंबेडकरी जनतेचा अस्मितेचा लढा ठरला. शहिदांच्या बलिदानातून आंबेडकरी जनतेने नामांतराचा लढा जिंकला.16 वर्षे प्रदीर्घ काळ अविरत लढा देऊन नामांतर आंदोलन आंबेडकरी जनतेने लढले आणि जिंकले. त्यामुळे नामांतर आंदोलन हे जगभरात आंबेडकरी जनतेच्या लढाऊ बाण्याचे प्रतीक ठरले आहे. असे सांगत ना रामदास आठवले यांनी नामांतर आंदोलनातील शाहिदांना अभिवादन केले. यावेळी लंडन मधील भारतीय उच्चयुक्त घनश्याम; रिपाइं चे अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष शकील सैफी;लंडन मधील गौतम चक्रवर्ती ;एच एल विरधी; अनुप गर्ग; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले दि.14;15 आणि 16 जानेवारी असे तीन दिवस लंडन दौऱ्यावर आहेत. लंडन दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी नामांतर दिनाचे औचित्य साधत लंडन मधील डॉ आंबेडकर स्मरकास भेट दिली. या दौऱ्यात दि. 16 डिसेंबर रोजी ना रामदास आठवले यांचा लंडनमधील भारतीयांच्या वतीने डॉ आंबेडकर स्मारक साऊथ हॉल लंडन येथे सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
लंडन मधील डॉ आंबेडकर स्मारकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.त्या लोकार्पण सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले ;तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री, राजकुमार बडोले आदींची उपस्थिती होती.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button