मराठी

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका नावांची यादी थेट गावातून

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१७-८-२०२१.
शिक्रापूर: सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकींचे वारे वाहू लागले असताना अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार आपल्या तयारीला लागले असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मात्र, शिक्रापूर जिल्हा परिषद गटातून नक्की कोणाची वर्णी लागणार? हे निच्छित नसले तरी पुणे जिल्ह्यातील राजकीय पैलवान मंगलदास बांदल, यांच्या सुटकेनंतरच या गटातील उमेदवारी बाबत सूत्रे जलद गतीने हलणार असल्याचे बोलले जात आहे.

शिक्रापूर हे पुणे जिल्ह्यात अल्पावधीत नावारूपाला आलेले गाव. पुणे जिल्हा आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल, यांनी अपक्ष निवडणूक लढवून जिल्हा परिषद सदस्य होण्याचा बहुमान मिळविला होता. त्यांनतर अद्याप पर्यंत तीन वेळा त्यांनी जिल्हा परिषद खेचून आणली आहे. यापूर्वी शिक्रापूर, जिल्हा परिषद गटातून मंगलदास बांदल, हे राष्टवादीच्या उमेदवारीवर निवडून आले होते. मात्र, बांदल, यांना राष्ट्रवादी पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यांनतर चालू जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान दिवंगत नेते बाळासाहेब खैरे, यांच्या पत्नी कुसुम खैरे,यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी बांदल यांनी शिक्रापूर गटातून निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, याचवेळी उमेदवारी खैरे यांनी आमदार बाबुराव पाचर्णे, यांच्या माध्यमातून भारतीय जतना पार्टीमध्ये प्रवेश केला,आणि परिणामी मंगलदास बांदल, यांनी पत्नीचा अपक्ष उमेदवारी अर्ज पुढे करत निवडणूक लढवून निवडणूक जिंकली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button