दुर्बल घटक आघाडीची २७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर…

आज दिनांक २२ / ०२ / २०१९ रोजी दुर्बल घटक आघाडीची २७ उमेदवारांची यादी जाहीर…
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दुर्बल घटक आघाडीच्या माध्यमातुन महाराष्ट्रात व ग्रामीण भागात तालुकावार, जिल्हास्तरीय सामाजिक काम करणाऱ्या १००० हजार संघटना व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात लोकसभेच्या ४६ जागा दुर्बल घटक आघाडी हि या जागा लढवणार आहे यामधल्या दोन जागा आम्ही जगाचे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे वंशज उदयनराजे भोसले व भारतीयराज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रकाशजी आंबेडकर यांचा समोर दुर्बल घटक आघाडी उमेदवार उभे करणार नाही.
दुर्बल घटक आघाडीचे उमेदवार का ?
भारत देश स्वतंत्र होऊन ७१ वर्षे झाले. परंतु अजून दुर्बल घटकांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही. भारत देशात सत्ता भोगलेल्या सर्व पक्षांनी दुर्बल घटकांच्या विषयांवर तोंड फिरवले आहे. हे सर्व पक्ष जातीधर्मावर, राजकारणे करतात म्हणून दुर्बल घटकांवर यांचे प्रेम कमी झाले आहे. यामुळे आम्ही सर्व राजकीय पक्षाचा दुर्बल घटकांच्या विषयांवर लक्ष वेधण्यासाठी लोकसभेला उमेदवार उभे करत आहोत. आमची मतदानाची ताकत आम्ही दाखवणार आहोत तसेच आमचे दोन उमेदवार तृतीयपंथी उभे करत आहोत कारण या समाजाला लोकांनी वाळीत टाकले आहे तसेच समाजापासून यांना वंचित केले आहे. आशा तृतीयपंथी समाजाला प्रतिनिधित्व देण्यापासून वंचित केले आहे. त्यामुळे त्यांना आम्ही पहिले प्राध्यान्य देणार आहोत तसेच अंध उमेदवार राजेश दयाल यांना नागपूर मध्ये उमेदवारी दिली आहे ।