मराठी
*खेड | अतिवृष्टीचा ७४ गावांना फटका; तहसीलदार

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,३०-७-२०२१.
पुणे,राजगुरुनगर
आठवड्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यात जवळपास ७४.गावांना याचा फटका बसला असल्याची माहिती तहसीलदार डाँ.वैशाली वाघमारे,यांनी दिली. २२,२३ व २५ जुलैच्या अतिव्रूष्टीमुळे कुडे मंडलात तीन आणि वाडा मंडलमधील एक अशी चार घरे अशंतः बाधित झाली. तर २९३ हेक्टर क्षेत्रातील शेतजमीनीचे नुकसान झाल्याचा अंदाज असुन आतापर्यत १०९३ शेतजमीनीसह पिकनुकसानीचे पंचनामे झाले आहे. तर जवळपास १२००.हून अधिक शेतक-यांचे पंचनामे करणे बाकी असल्याची माहिती महसुल नायब तहसीलदार मा. संजय शिंदे, यांनी दिली.
तालुक्यात नजर अंदाज आणि पंचनामे सुरु असल्याने ७४.गावांचे नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे.