पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, यांच्या उपस्थितीत हिंजवडीत जनता दरबार

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२२-८-२०२१.
पिंपरी : पोलीस ठाण्याच्या सभागृहात भरवलेल्या या दरबारात ५०. हून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले. या जनता दरबारात हिंजवडी पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जामधील अर्जदार व गैरअर्जदार यांना बोलाविण्यात आले होते. या वेळी आनंद भोईटे,यांचे उपस्थितीत अर्जदार यांनी केलेल्या तक्रारीबाबत अर्जदार व गैरअर्जदार यांचे म्हणणे ऐकून घेतले व सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अधिकारी यांना सूचना व मार्गदर्शन करुन अर्जदार यांचे तक्रारीचे निरसन करण्यात आले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीमधील परिमंडळ १. व २.मधील पोलीस उपायुक्त यांना जनता दरबार घेऊन नागरिकांना असलेल्या तक्रारींचे निरसन करण्याबाबत सूचना दिल्या होत्य
या वेळी सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डीसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दहिफळे, व हिंजवडी पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.