मराठी

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यावर कोरोना योद्ध्या युनूस पठाण कडून बौद्ध विधीवत पद्धतीने अंतिम संस्कार

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
पिंपरी : सध्याच्या कोरोना काळात कोण आपले व कोण परके याची याची मोठी जाणीव शिकवणचं एक प्रकारे हा कोरोना संसर्गजन्य विषाणुजन्य आजार, याने देशाला घालून दिली
दिवसेंदिवस कोरोनाने देशात महाराष्ट्रात थैमान घातले आसून याची लागण बऱ्याच लोकांना झाली,काही धैर्याने औषध उपचाराने बरे झाले तर असंख्य लोकांनी उपचारास प्रतिसाद न देता आपले प्राण त्यागून जगाचा निरोप घेतला,अशा कठीण काळात कुणीच कुणाच्या जवळ जायला तयार नसताना,मतभेदाचे भितीचे वातावरण असताना स्वतःच्या कुटुंबाची कुटुंबातील सदस्य व स्वतःची जीवाची परवा न करता कोरानाग्रस्त रुग्ण यांची त्यांच्या जवळ बसून विचारपूस करून प्रसंगी त्यांना जेवण खाऊ घालून त्यांचे समावेत रुग्णालयात वेळ देऊन त्यांचे मनोबल वाढविणारे प्रसंगी सर्वोत्परी कोराना रुग्णांची सेवा करून त्यांचे मनोबल मनोधैर्य वाढवून त्यांना बरे होण्यास मदत करणारे,खरे कोरोना योद्धा युनूस पठाण यांची असंख्य उदाहरणे आज समोर येतात.गेल्या वर्षी राज्य सरकारच्या वतीने त्यांचा जाहिर नागरी सत्कार ही झाला महाराष्ट्रातील पुण्यातील विविध पक्ष संघटना,सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांचा यथोच्छ सत्कार सन्मान केला,परंतु ह्या सन्मानाची जाणीव सातत्याने ठेवत त्यांनी आपले समाजकार्य कायम पुढेचं नेहत ठेवले आजवर दोन चार नव्हे तर तब्बल ७९ कोरोनाने मृत्यू पावलेल्या महिला पुरुष युवक युवती बालके यांचे त्यांच्या त्यांच्या धर्म रितीरिवाजा प्रमाणे धार्मिक अंत्यविधीवत अंतिम संस्कार हे मोफत स्वरुपात केले,ही गौरवशाली सामाजिक बाब असतानाच त्यांनी व त्यांच्या सोबत नेहमी वेगवेगळी आसणारे सहकारी यांनी कधीही कुणालाही आर्थिक पैशाची मागणी केली नाही.
एकीकडे देशात महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील शहरी ग्रामीण भागात कोरोनाच्या नावा खाली भिती छताखाली शासन प्रशासन जिल्हा प्रशासनात सर्वोत्परी पातळीवर भ्रष्टाचाराची विविध उदाहरणे शासकीय व निमशासकीय बाबी बरोबरीने समाजातील विविध स्थरावर औषधे,इंजेक्शन,आँक्सिजन,बेड इतर सेवा सुविधां मध्ये प्रचंड अफरातफरीसह काळाबाजार घोटाळे दररोज होत आसताना सामाजिक कार्यकर्ते कोरोना योद्धा युनूस पठाण यांचे कडून लोकांनी समाजसेवा शिकण्याची गरज वाटते.एक आदर्श कोरोना योद्धा म्हणून मा.श्री यूनूस पठाण यांनी हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन,बौद्ध व इतर समाजातील घटकातील लोकांच्या मनात जागा मिळवली आहे.असंख्य लोकांच्या प्रेरणा आशिर्वादाने आद्याप “मला कोरोनाची लागण झाली नाही व मला कोरोनाने गाठले तरी मी भित नाही जीवात जीव असे पर्यंत कोरोना रुग्ण व कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची सेवा करण्याचे व्रत मी सोडणार नाही” असे ते मिश्कीलपणे धाडसाने हसत बोलून जातात व स्वतःतील मनोधैर्य याचे दर्शन घडवून देतात, तसेच “माझ्या असंख्य ओळखिच्या लोकांनी माझे कधीही खच्चीकरण केले नाही तर माझा नेहमी सत्कार सन्मान करुन माझा आत्मविश्वास वाढविला,आहे मी समाजाचे देणे लागतो प्रत्येक कार्यकर्ते यांनी माझ्या प्रमाणे निस्वार्थी समाजसेवेत उतरावे आज देशाला,लोकांना आपली खरी गरज आहे कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती संकट आहे ते एकवेळ पुर्णपणे निघून जाईल,आपण आपली कर्तव्ये जबाबदारी ओळखायला हवे”असे त्यांनी जाहिर आव्हान केले आहे!
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते श्री सुनील गायकवाड यांचे निधन झाल्याची वार्ता पुण्यातील कार्यकर्ते यांनी दुरध्वनी वरुन कोरोना योद्धा,सामाजिक कार्यकर्ते मा श्री युनूस पठाण यांना दिल्या,त्यांनी लगबगीने आपल्या सहकारी यांचे समवेत पिंपरी चिंचवड चे जम्बो कोविड सेंटर वाय.सी.एम रुग्णालये येथे धाव घेऊन सर्व धावपळ करुन प्रक्रिया पुर्ण करुन पिंपरी लिंक रोड येथे मृत्यू झालेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचे शव नेहून बौद्धाचार्य बौद्ध भिकू यांस पाचारण करुन मान सन्मानपुर्वक बौद्ध धार्मिक रितीरिवाज विधीवत पद्धतीने अंतिम संस्कार नातेवाईक मिञ मंडळी यांचे समवेत उरकून घेतले,यावेळी बौद्ध भिकू यांनी विधी संपल्यानंतर जाणीवपूर्वक कोरोना योद्धा सामाजिक कार्यकर्ते मा श्री युनूस पठाण यांचे स्मशानभूमीतच कार्यकर्ते नातेवाईक मंडळी यांचे समोर बौद्ध आशिर्वाद गाता गाऊन सन्मानाने कौतुक करुन सदर चांगल्या कामा बद्दल आभार मानले,लोकांनी या संकट समयी कोरोना योद्धा युनूस पठाण यांचे व त्यांच्या सहकारी कार्यकर्ते यांचे कडून प्रेरणा घ्यावी असा मोलाचा संदेश देत सदर चांगल्या कामाचे कौतुक सोशल मिडियाद्वारे लोकांच्या पर्यंत समाजातील प्रत्येक बांधवाने पोहचवायला हवे यातून जनजागृती होईल असंख्य लोकांना मदत सहकार्य होईल, असे आव्हान केले “कोरोना योद्धा म्हणून माझा आजवर प्रत्येक समाजाने समाजातील प्रत्येकाने केलेल्या सन्मान व माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थकी लावीन”असे म्हणून सर्व उपस्थितांचे मा श्री युनूस पठाण यांनी मनापासून आभार मानले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button