मराठी

*पारनेर नगर मतदारसंघातील जनता पार्टीचे उमेदवार प्रसाद खामकर यांचा परिचय*

प्रसाद खामकर यांचा जन्म हंगा येथे 18 सप्टेंबर 1991 ला मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या माळी कुटुंबात झाला , वडिलांचे बापू गोविंद खामकर हे खासगी ट्रान्सपोर्ट मध्ये चालक म्हणुन काम करत होते , आणि आई गृहिणी होत्या , घरची परिस्थिती अतिशय हलाकीची होती , प्रसाद खामकर यांचे 1 ते 10 वी शिक्षण हे हंगा येतील प्राथमिक तसेच रयतच्या माध्यमिक विद्यालयात झाले , शिक्षण घेत असताना त्यांना आधीपासूनच सामाजिक कार्याची आवड होती , ते वेगवेगळ्या भाषण स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा यात भाग घायचे , शालेय शिक्षण घेत असताना हंगा येथील एकेकाळीचे जिल्ह्यातील राजकीय अभ्यासक तथा बहुजन नेते कै ऍड नाथ माधवराव शिंदे यांच्या कार्याने प्रसाद खामकर यांना प्रेरना मिळाली व त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली , पुढील महाविद्यालयिन शिक्षण त्यांनी पारनेर येथील न्यू आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज पारनेर येथे पूर्ण केले , त्या दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या वाद विवाद स्पर्धा असो , महाविद्यालयातील स्नेहसंमेलन असो , सामाजिक विषयावरील जनजागृती असेल , राष्ट्रीय सेवा योजना असो ,राष्ट्रीय छात्र सेना असेल यात त्यांचा खूप आवर्जुन सहभाग असायचा , या दरम्यान त्याना विविध पुरस्कार महाविद्यालयात जीवनात मिळाले , एक सामाजीक बांधीलकी जाण महाविद्यालयापासून त्यांना होती. सामाजिक कार्यात त्याना आवड प्राप्त झाली होती , पण त्यांना घरची परिस्थिती हालकीची असल्याने त्यात सहभाग घेता येत नव्हता म्हणून त्यांनी बरेच काळ सुपा MIDC मध्ये कंत्राटी कामगार कंपनी मध्ये रात्री काम करून दिवसा शिक्षण पूर्ण केले , सुरक्षा रक्षक म्हणून त्यांनि त्यावेळी काम केले ,
प्रसाद खामकर यांना समाजसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती पण प्रथम पोटाची खळगी भरणे गरजेचे होते , अश्या परिस्थिती मध्ये खामकर यांनी 2012 मध्ये शासकीय नोकरी साठी अर्ज केला होता , महाराष्ट्र सुरक्षा बल या मध्ये त्यात त्यांची शिपाई पदावर निवड झाली , आणि खामकर यांनी महाराष्ट्र पोलीस ट्रेनिंग सेंटर गोरेगाव मुंबई येथे प्रशिक्षण पूर्ण केले , त्यानंतर लगेच खामकर यांना नवीदिल्ली येथील महाराष्ट्र सदन ह्या राज्य सरकारच्या अधीन असलेल्या ठिकाणी विशेष ड्युटी देऊन पाठवण्यात आहे , आणि खामकर रुजू झाले , देशाची राजधानी दिल्ली मध्ये खामकर हे नवीन होते पण त्यांच्या अभ्यासू व्यक्तीमत्वामुळं त्यांना कुठेही अडचण आली नाही , या दरम्यान त्यांना राज्याचे मुख्यमंत्री , राज्यपाल , राज्यातील मंत्री अशा वरिष्ठ लोकांचा सहवास लाभला होता त्यांच्या सोबत काम कऱण्याचा योग खामकर यांना आला , त्याच काळात ते ज्या खात्यात काम करत होते त्यात काही कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या अन्याय कारक अटी राज्य सरकार ने लावल्या होता , त्याचा कर्मचारी यांच्याकडून विरोध होत होता , खामकर यांना आधीपासूनच कोणावर झालेला अन्याय सहन होत नव्हता , प्रथम त्यांनी सरकारशी पत्रव्यवहार केला नंतर सरकार विरोधात महाराष्ट्र राज्यात मोठं आंदोलन उभे केले आणि 20 हजार लोकांना संप करण्यास भाग पाडले , या दरम्यान खामकर यांना मिळालेली नोकरी यात गमवावी लागली त्यांनी लोकांच्या भल्यासाठी आपल्या नोकरीचीही पर्वा केली नाही , पुढील काळात खचून न कामगार होणाऱ्या अन्याय विरोधात लढा उभारला आणि वीज कंत्राटी कामगार असो , सुरक्षा रक्षक असो , माथाडी कामगार असो यांच्यासाठी वेळोवेळी शासनाशी संघर्ष केला आणि चर्चेतुन प्रश्न सोडवले , त्यादरम्यान अनेक गुन्हे ही शासनाने त्यांच्यावर दाखल केले , तरी खामकर डगमगले नाही ,त्यांचं अभ्यास आणि काम पाहून भारतीय पत्रकार संघटनेने त्यांना 2014 रोजी उत्तर प्रदेश राज्यचा सल्लगार म्हणून नियुक्ती दिली , त्यानंतर खामकर यांनी पुढील 1 वर्षे दिल्ली येथे राहून उत्तर प्रदश राज्यात पत्रकारबंधू करिता काम केलं , त्यावेळी खामकर यांचं वय अवघ 24 वर्षे होत , पुढील काळात त्यांच्या कामाची दखल शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्यांचे अध्यक्ष श्री वानखेडे यांनी श्री खामकर यांना संघटनेचा राज्यचा सचिव पदावर नियुक्ती केली , त्याच माध्यमातून खामकरयांनी राज्यातील गोर गरीब , शोषित ,वंचीत जनतेचे असंख्य प्रश्न सोडवले , आरोग्य योजने मधून लाखो रुपयांची मदत राज्यातील रुग्णाना मिळवून दिली ,2015 नंतर खामकर त्यांनी देशातील सर्वोच्च सदन असलेल्या संसद भवनात , तीन वर्षे दरम्यान माजी खासदार नानाभाऊ पटोले आणि आता सध्या खासदार धर्यशीलदादा माने यांच्यासोबत काम केले , संसदेचा कामकाजचा दांडगा अनुभव त्यांना आहे , संसदीय कामकाज पद्धतीवर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे , मराठी जनतेला अनेक केंद्र सरकार च्या योजनेचा लाभ खामकर यांनी मिळवून दिला आहे ,देशपातळीवर राजकिय रननितीकार आणि विश्लेषक अशी त्यांची ओळख आहे.कित्येक वरिष्ठ केंद्रीय मंत्री व केंद्रीय वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्याशी खामकर यांचे सलोख्याचे संबंध आहेत त्याच माध्यमातून सध्या खामकर जनतेचे सध्या प्रश्न सोडवत आहेत ..
एवढं सगळं ह्या माणसाने फक्त वय वर्षे 28 असताना केलं आहे , अजूनही प्रवास सुरु आहेच …जनतेचे प्रश्नजर सोडवायचे असतील तर स्वतः राजकीय क्षेत्रांत आलं पाहिजे असं वाटल्याने आणि दिल्लीचा राजकिय वरदहस्त प्राप्त असल्याने कसलंही आर्थिक पाठबळ नसताना एक धाडसी निर्णय त्यानि घेतला आहे तो म्हनजे स्वतः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लढवणयाचा तो ही वय वर्षे 28 असताना आपल्या जन्मभूमी कर्मभूमी पारनेर नगर मतदानसंघातून ………..

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button