महानगरपालिकेत मा महापौर सौ माई ढोरे मा आयुक्त श्री. राजेश पाटील, यांच्या समावेत शहरातील करोणा परिस्थिती आढावा बैठक घेतली

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,९-५-२०२१.
मा.आमदार श्री.लक्ष्मणभाऊ जगताप,साहेब यांनी आज महानगरपालिकेत मा.महापौर सौ.माई ढोरे,मा.आयुक्त श्री.राजेश पाटील यांच्या समावेत शहरातील करोणा परिस्थितीत आढावा बैठक घेतली…ऑक्सिजन बेड,व्हेंटिलेटर बेड,ई रूग्णांना लागणारी उपलब्धता याची माहीती व रूग्णांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी लागणारे पौष्टिक खुराक वाढवावा,ऑक्सिजन पॅन्ट लवकरात लवकर उभारावेत, जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणासाठी लागणा-या लस उपलब्धतेसाठी उपायोजना कराव्यात, लॉकडाऊनची परिस्थिती पाहता अर्थिक दुर्बल घटकांन३०००-००रू.अर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात यावे,करोणाची तिसरी लाटेच्या उपाययोजना म्हणून म.न.पा.मालकीच्या इमारतीत कोविड सेंटर रुग्णालयाची उभारणी करावी..त्यामुळे म.न.पा.चा अर्थिक फायदा होऊन सदर बचतीमधुन रूग्णांनाच्या उपचारासाठी चांगल्या सुविधा देण्यात येईल..पवना व मुळा नदीपात्रातील जलपर्णी लवकरात लवकर काढण्यात यावी..अश्या प्रकारे प्रशासनाला निर्देश देण्यात आले…मा.नामदेव ढाके,(पक्षनेते),श्री.नितीन लांडगे, (अध्यक्ष-स्थायी समिती) सौ.नानीताई घुले,(उपमहापौर).उपस्थित होते.