मराठी

पुण्यात मृत्युंच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार उघडकीस,मृत व्यक्तीच्या बँकेतून पैसे लंपास

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, ६-५-२०२१.

पुणे | … वडील आजारी असल्याने त्यांच्या खात्याचा व्यवहार बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर अंकिता रंजन आणि व्यवस्थापक जुबेर गांधी हे घरी येऊन आवश्यक ती मदत करत होते. दरम्यान १०.मार्च रोजी फिर्यादी यांच्या वडिलांचे निधन झाले.इंडसंड बँकेतील महिला रिलेशनशिप मॅनेजर आणि व्यवस्थापकाने मृत व्यक्तीच्या खात्यातून बनावट सही द्वारे पैसे काढत अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आजारी व ज्येष्ठ नागरिकांना घरपोच बँकिंग सेवा देताना हा प्रकार उघडकीस आला आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला..अंकिता रंजन (वय ३०.) आणि जुबेर गांधी (वय ३४.) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रशेखर राजगोपालन यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या वडिलांचे विमानतळ येथील इंडसंड बँकेत बचत खाते आहे. त्यांचे त्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांच्या मोबाईलवर निप्पॉन इंडिया म्यूचुअल फंड या कंपनीचा मेसेज आला. २२.मार्च रोजी केलेल्या विनंती मध्ये बनावट सही असल्यामुळे व्यवहार पूर्ण करता येत नाही असेे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर फिर्यादीला या सर्व प्रकाराचा संशय आला. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन माहिती घेतली असता त्यांच्या वडिलांच्या खात्यात केवळ ४.हजार ५९६.रुपये दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button