मराठी

पिंपरी चिंचवडमध्ये ‘या’ठिकाणी मिळणार दिव्यांगासाठी मोफत कोरोना लस

 

संवाददाता, सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२२-७-२०२१.
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग व्यक्तींचे सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्पार्क मिंडा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंकुशराव लांडगे, नाट्यगृह, भोसरी येथे शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी विनामुल्यकोविड-१९. प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या उपक्रमास स्पार्क मिंडा फाऊंडेशन यांच्यासामाजिक जबाबदारी विभागाचे(CSR)सहकार्य लाभले आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या प्रथम नागरीक महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे,व स्थायी समितीचे सभापती अॅड.नितीन लांडगे, यांच्याहस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसदस्या भिमाबाई फुगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,राजेश आगळे, महिला वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा भावसार,प्रशासन अधिकारी नाना मोरे,स्पार्क फाऊंडेशनचे नितिका गुल्हाने-लोहे, निलेश पवळे, सुमेध लव्हाळे, संजय खैरकर ,माहिती व जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे, आदी उपस्थित होते. याप्रसंगी महापौर आणिइक्वीटस फायनान्स बॅंकेचे अधिकारी संग्राम पाटील, यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींनी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button