पिंपरी चिंचवड मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी धक्कादायक

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२०-६-२०२१.
पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. काही दिवसांच्या फरकाने टोळ्या आपले अस्तित्व दाखवत एकमेकांच्या टोळी सदस्यांवर हल्ले करतात. निगडी परिसरात अशाच दोन टोळक्यांमध्ये झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.६.जून रोजी वाकड मध्ये परिसरातील वर्चस्ववादातून एका तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला.पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चोरी, जबरी चोरी यांसारख्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे म्हटले जाते. मात्र खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी मागील वर्षीपेक्षा अधिक आहे.