मराठी

पिंपरीगावामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वा.सैनिक निवृत्ती वि.वाळुंजकर, यांस मानवंदना व कोरोना योद्धाचा सन्मान

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१६-८-२०२१.
पिंपरी १५ ऑगस्ट : रोजी भारत स्वातंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे अमृतमहोत्सवी वर्ष.स्वा. सैनिक निवृत्ती वाळुंजकर यांस मानवंदना देऊन व कोरोना योद्धांचा सन्मान वाळुंजकर वाडा पिंपरी गाव येथे अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड एस बी चांडक, सर अध्यक्ष इंद्रायणी बँक ली,पिंपरी चिंचवड, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे गुरुवर्य माऊली महाराज वाळुंजकर, पिंपरी चिंचवड समाज भूषण पुरस्कृत, मा.श्री. संजोग वाघेरे, शहराध्यक्ष रा काँग्रेस पार्टी पिं. चिं. शहर, मा. श्री. संदीप वाघेरे, नगरसेवक, पिं. चिं. महा,मा. श्री. प्रभाकर वाघेरे, मा उपमहापौर पिं चिं महा.श्री. प्रफुल्ल पुराणिक, जनसंपर्क अधिकारी, पिं. चिं.महा. व कार्यक्रमाचे वक्ते इतिहास संशोधक रविंद्र जगदाळे, सर स्वातंत्र चळवळीत पिंपरी चिंचवड मधील “सर्व स्थानिक स्वा. सैनिकांनी त्याकाळात जीवाची पर्वा न करता मुंबई पासून पुण्याला येणारी विद्युत वहिनी पाडून पुण्यातील इंग्रजांचे कामकाज बंद पडले यानंतर इंग्रजांनी स्वा. सैनिकांची माहिती देणाऱ्यास मोठे बक्षीस ठेवले पण स्वातंत्र्य चळवळीची लाट असल्याने हे शक्य झाले नाही, यात श्री. बाळकृष्ण पुराणिक, मिरजकर, रामभाऊ काटे, निवृत्ती वाळुंजकर,यांचा प्रामुख्याने समावेश होता व इंग्रज चौकी समोर राष्ट्रगीत म्हणणं, नागरिकांचे संघटन करणं” अश्या सर्व केलेल्या कार्याची माहिती दिली आजच्या युवकांनी स्वातंत्र सैनिकांना आदर्श मानले पाहिजे आणि देश विकासासाठी पुढे आले पाहिजे असे आव्हान केले व नगरसेवक संदीप वाघेरे, यांनी निवृत्ती वाळुंजकर, सरपंच असताना गावातील पिंपरी गाव ते पिंपरी कॅम्प पहिला रस्ता बांधकाम करणे, सामान्यांना शिक्षण घेता यावे या करिता रयत शिक्षण संस्थेचे नवमहाराष्ट्र विद्यालय उभारले, गावात पाणी पुरवठा व इतर सामाजिक कार्याची माहिती देऊन मनोगत व्यक्त केले,आजच्या कोरोनाच्या संकटात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली २२, कोरोनायोद्धाना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय कार्यरत असलेले रक्तमित्र संजय गायके,यांचा विशेष सत्कार करण्यात आला, सूत्रसंचालन तानाजी वाळुंजकर, भाजपा नेते विशाल वाळुंजकर, गणेश वाळुंजकर, अभाविप जिल्हा संयोजक गौरव वाळुंजकर, सुमित माटे, किरण वाळुंजकर, सौरभ वाळुंजकर, प्रसाद वाळुंजकर, गिरीश वाळुंजकर, दर्शन रायकर, आदी उपस्थित होते.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button