मराठी

पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग व इतर आस्थापना गेल्या दोन महिन्यांचा जीएसटी भरू शकले नाहीत. त्यामुळे जीएसटी भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देऊन हा कर भरणाऱ्या सर्वांना दिलासा द्यावा,

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक ४-५-२०२१.
अशी मागणी आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप,यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण, यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी निर्मला सितारमण यांना ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. एप्रिल महिन्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढवण्यात आलेला आहे. लॉकडाऊनमुळे जीएसटी भरण्यास बांधील असलेले व्यापारी व इतर आस्थपना मुदतीत तो भरू शकले नाहीत. त्यांना जीएसटी भरण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही.

जीएसटी कर भरणाऱ्या प्रत्येकाला कर भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता सुद्धा करता आलेले नाही. सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे व्यापारी वर्ग व इतर आस्थापना गेल्या दोन महिन्यांपासून अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. आपण या समस्या समजून घेऊन अर्थमंत्रालयाने जीएसटी भरणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक करदात्याला एप्रिल आणि मे २०२१ या दोन महिन्यांचा जीएसटी भरण्यासाठी ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ द्यावी. ही मुदतवाढ मिळाल्यास जीएसटी भरणाऱ्या सर्वांना खूप मोठा आधार मिळेल, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button