पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी फेब्रुवारी २०२२.मध्येच*

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१९-६-२०२१.
पिंपरी चिंचवड: निवडणुका सहा महिने पुढे ढकलणार यामुळे अनेक इच्छुक संभ्रमात होते. मात्र निवडणुक आयोगाने मतदार याद्या नुतणीकरणाचा कार्यक्रम हाती घेतल्याने निवडणुका फेब्रुवारी २०२२.मध्येच होणार हे स्पष्ट झाले आहे.राज्याच्या मुख्य निवडणुक आयुक्तांनी पत्र क्र.ईएलआर २०२०./प्र.क्र.३९५./२०./३३.नुसार मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे आदेश दिले असून, या पत्रानुसार मा. दिल्हाधिकारी पुणे यांनीअन्वये या मतदार याद्यांचे विशेष पुनरिक्षणाचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मतदार नोंदणी अधिकारी २०६.पिंपरी (अ.जा)विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकार यांनी पत्रक प्रसिध्द केले आहे.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी फेब्रुवारी 2022 मध्येच सुरु होणार आहे. राज्य निवडणुक आयोगाने शहरातील मतदार याद्या नुतनीकरणाच्या कामास सुरुवात केली आहे. मतदार याद्यांचे अद्ययावतीकऱणाचा कार्यक्रम जाहीर कऱण्यात आला आहे.