पुणे जिल्ह्यात लक्ष घालायला त्यांना वेळ नसेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलावा. चंद्रकांत पाटील

संवाददाता, तानाजी केदारी महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२३-४-२०२१.
पुणे | पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. अजित पवार,यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं. पुणे जिल्ह्यात लक्ष घालायला त्यांना वेळ नसेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलावा, अशी टीका चंद्रकांत पाटील, यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील, यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या १५.दिवसांंच्या संभाव्य लाॅकडाऊनला विरोध केला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार, यांनी मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं अन्यथा मी तुमच्या मुलांपासून सर्वांचे शॉटफॉर्म करेन, असा इशारा चंद्रकांत पाटील, यांनी दिला होता. आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत, त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील, असं चंद्रकांत पाटील, यांनी म्हटलं होतं. दरम्यान, चंद्रकांत पाटलांबरोबर अनेक भाजप नेत्यांनी लाॅकडाऊनला विरोध केला आहे. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार आता थंडावला आहे. त्याचबरोबर तिथे मतदान प्रक्रियाही पार पडली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकात पाटील, यांच्यात चांगलीच जुंपली होती. आता पुन्हा चंद्रकांत पाटील, यांनी अजित पवार, यांच्यावर टीका केली आहे. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री १५.दिवसांचा संपूर्ण लाॅकडाऊन जाहीर करतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांंगितलंय.