ससूनमध्ये म्युकर मायकोसिस निम्मे रुग्ण बाहेरचे: डॉ समीर जोशी

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,९-६-२०२१.
पुणे विभागात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यांचा समावेश होतो. ससून रुग्णालयात या भागातील तसेच नगर जिल्ह्यासोबतच जळगाव, उस्मानाबाद, बीड, रत्नागिरी, अलिबाग, उस्मनाबाद, अंबेजोगाई, अकोला येथूनही ‘म्युकरमायकोसिस’ झालेले रुग्ण येत आहेत.यातील अनेक रुग्णांची स्थिती ही अतिशय गंभीर असते

. या रोगाची लागण झाल्यानंतर तेथे स्थानिक पातळीवर त्यांनी उपचार केलेले असतात. त्यात त्यांच्या शस्त्रक्रियाही केलेल्या असतात.त्यामुळे आधीच डोळा, जबड्याचा काही भाग काढून टाकलेले असतात. तेथे पुढील उपचार करणे शक्‍य होत नाही, अशा परिस्थितीत ते ससूनमध्ये दाखल होत आहेत.

त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे अवघड जाते, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.ससूनमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ची लागण होऊन दाखल झालेले सुमारे निम्मे रुग्ण हे पुणे विभागाच्याही बाहेरचे आहेत. सध्या यांची संख्या सुमारे ५०.च्या जवळपास असून, रोज दाखल होणाऱ्या १०.रुग्णांमध्ये दोन-तीन रुग्ण तरी पुणे विभागाच्याही बाहेरचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *