मराठी

आंबवणे ग्रामपंचायत हद्दीतील गोर गरिबांना एक महिन्याचे धान्य वाटप, 1200 कुटूंबाना केले धान्य वाटप,

ब्रिजेश बडगूजर कार्यकारी संपादक :-सरपंच मच्छिंद्र कराळे आणि मित्र परिवार यांचा स्तुत्य उपक्रम,
आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले धान्याचे वाटप,

आंबवने ग्रामपंचायत हद्दीतील गोर गरीब बाराशे कुटूंबाना आज सरपंच मच्छिंद्र कराळे परिवार आणि उधोजक राजकुमार गुप्ता, यांच्या वतीने गोर गरीब बाराशे कुटूंबाना आज धान्य वाटप करण्यात आले, यावेळी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते गोर गरीब जनतेला या धान्याचे वाटप करण्यात आले,हा कार्यक्रम आज ग्रामपंचायत आंबवणे येथे पार पडला ,
संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचे मोठे संकट आले असून सरकारने 14 एप्रिल पर्यत लॉकडाऊन जाहीर केला आहे, त्यामुळे ज्यांचे हातावर पोट असलेलं गोर गरीब आदिवासी बांधवाचे अतोनात हाल होत आहेत, याची दखल सरपंच मच्छिंद्र कराळे परिवार,उधोजक राजकुमार गुप्ता, अक्षय अरोरा, ज्ञानेश सामंत, उद्योजक गोरख शेठ कराळे ,आणि तुषार सुपर मार्केट यांच्या वतीने आंबवणे ग्रामपंचायत हद्दीतील आंबवणे, साळतर, माजगाव,पेठ शहापूर, नांदगाव, घुसलखांब, जांभुलणे,गेलदांड, देवघर विसाघर, या गावातील 600 कुटूंबाना तर बाल आशाधर आश्रम येथील अनाथ 70 मुलांना धान्याचे वाटप करण्यात आले,


तर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उधोजक नंदकुमार वाळंजू, गोविंद वर्मा, यांच्या वतीने कोळवली, कुभेरी, पोंमगाव, मुळापूर, येथील 600 मजूर कामगाराना धान्य वाटप करण्यात आले,अश्या एकूण आज 1200 कुटूंबाना आज धान्य वाटप करण्यात आले,
यावेळी आमदार संग्राम थोपटे, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हान,गटविकास अधिकारी संदीप जठार, आंबिव्हली सिटीचे एक्सटीव रोमी दत्ता,सी ओ विशाल वर्मा, माजी सभापती कोमल वाशिवले, तलाठी प्रकाश वाघमारे,उधोजक अशोक अरोरा, गोरक्ष कराळे, संचालक धनंजय वाडकर, गंगाराम मातेरे, दादाराम मांडेकर,सुहास गोते, सामाजिक कार्यकर्ते निलेश दगडे, अमूल शिंदे, मधुर दाभाडे, प्रकाश मानकर, महादेव सुतार, आंबवने ग्रामपंचायतचे सरपंच मच्छिंद्र कराळे, उपसरपंच गोरक्ष (काका) मेहता माजी उपसरपंच गणेश मानकर, सदस्या संगीता नेवासकर,शोभा हिरवे,सदस्य चिमाजी तिडके, ग्रामसेवक बी टी यादव, पोलीस पाटील गणेश दळवी, विजय हुंडारे, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश वाळंज, माजी नगराध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेवक नितीन अगरवाल, मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पारख, कुमार धायगुडे, बाळासाहेब फाटक, संजय अडसूळ, रमेश शिंदे, नवनाथ दळवी आशावर्कर आशा मोडवे आदींसह कर्मचारीसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button