मराठी

राज्यातील सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात … २३ जून रोजी बैठकीत निर्णय

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२३-६-२०२१.
राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱयांच्या निवृत्तीचे वय ६०.करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. या मागण्यांच्या संदर्भात २३.जून रोजी बोलावण्यात येणाऱया राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दिला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱयांनी पुन्हा एकदा मागण्यांचा रेटा वाढवला आहे. महासंघाच्या म्हणण्याप्रमाणे कर्मचाऱयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, प्रशासनातील अधिकाऱयांच्या वेळोवेळी भेटी घेतल्या, पण प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे राज्यातील राजपत्रित अधिकाऱयांमध्ये असंतोष खदखदत आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे आंदोलनात्मक भूमिका घेण्यासाठी राज्यभरातून महासंघावर दबाव वाढत असल्याचा दावा महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई व अन्य पदाधिकाऱयांनी केला. सरकारी कर्मचाऱयांच्या मागण्यांच्या संदर्भात विचारविनियम करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महासंघाची बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या २३.जून रोजी होणाऱया महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे असे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button