मराठी

दरोड्यासाठी गावठी कट्टा, कोयता, सुरीचा उपयोग … मनसेच्या पदाधिकाऱ्यासह ४.जणांना बेड्या

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,७-७-२०२१.
पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. या पथकाने लोणीकंद परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक केले. पोलिसांनी या टोळीकडून गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी असा १ लाख १५.हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी दत्ता गायकवाड (वय २३.), गौरव परजणे (वय २०,)किशोर जाधव (वय २२.), दत्ता व्यवहारे (वय ३७.सर्व रा. वाघोली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार अजय माकर (वय २५.) फरार झाला आहे. यामधील दत्ता व्यवहारे हा मनसेच्या सहकार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई ऋषिकेश व्यवहारे व पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे यांना एक गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार लोणीकंद ते बकोरी रस्त्यावर खंडोबाचा माळ परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चार जणांना ताब्यात घेतले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button