मराठी

पुणे,आळेफाटा परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,५-७-२०२१.

पुणे : चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून आळेफाटा पोलिसांनी पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, एक जण फरारी आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली

आरोपींनी पीडित मुलीचे फोटो काढले आणि इतरांना पाठविण्याची धमकी देऊन, १५ जून २०१९ ते १५ जून २०२१ या दोन वर्षांच्या कालावधीत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्यानुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल पोटे, विकी पोटे, बंटी तितर, दया टेमगिरे आणि यश गाडेकर अशी आरोपींची नावे आहेत. ते सर्व जण २८ वर्षे वयाचे असून, आळेफाटा परिसरात राहणारे आहेत. आरोपी वापरत असलेले आलिशान वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित मुलगी नववीत शिकत असून, या प्रकरणी तिने गुरुवारी रात्री फिर्याद दिली आहे

या तरुणांकडून दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. पीडितेच्या वडिलांनादेखील आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फरारी आरोपीचा पोलिस शोध घेत असल्याचे निरीक्षक पवार यांनी सांगितले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button