इंदापूर येथे सोमवारी पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, ९-६-२०२१.
भरधाव वेगातील कारचे टायर फुटून ती विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर येत बोलेरोला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील एक व बोलेरोमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूरजवळील हॉटेल पायलजवळ सोमवारी (दिनांक,७) दुपारी ३-०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

ज्योतिराम सूर्यभान पवार, वय वर्षे(वय ३६, रा. उलवे, रायगड), अविनाश कुंडलिक पवार वय वर्षे(२८), गणेश पोपट गोडसे वय वर्षे ३८.व बाळासाहेब चांगदेव साळुंखे, वय(४९, तिघे जण, रा. गुरसाळे, सोलापूर) अशी मयत झालेल्या इसमांची नावे आहेत. सोलापूर बाजूकडून भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने निघालेल्या इर्टिका (एमएच ४६.बीई ४५१५.) कारचे टायर अचानक फुटल्याने ती डिव्हायडर तोडून विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *