मराठी

कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अटी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२२-६-२०२२.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगीसोशल डिस्टसिंगचे पालन न करता अटी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात प्रामुख्याने शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निलम, बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन पायगुडे, युवक अध्यक्ष महेश हांडे यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. सकाळी लोकांना लॉकडाऊन पुन्हा लावण्याची तंबी दिल्यानंतर कोरोना नियमांचे उल्लंघन होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ खंत व्यक्त केली. यावरुन अजित पवार यांना सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले.

याबाबत शनिवारी पोलिसांनी चुप्पी साधली होती. व्हिडिओ आणि फोटो पाहू कारवाई करुन असे सांगण्यात येत होते. मात्र, सोशल मिडियावर होत असलेली टिका टिप्पणीनंतर पोलीस कार्यरत झाले. त्यानंतर रविवारी सकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button