मराठी

शालेय फि पन्नास टक्के माफ करा; फि माफी नाकारणा-या शालेय संस्थांवर कारवाई करा…..सचिन साठे

सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१०-७-२०२१.
कोरोना महामारी लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून लाखो नागरीक बेरोजगार झाले आहेत. बहुतांशी पालक आपल्या पाल्यांची शैक्षणिक फि देखिल भरु शकत नाहीत. पालकांच्या प्रचंड दबावानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तांनी खाजगी शिक्षण संस्थांनी पंधरा टक्के फि कमी घ्यावी असा आदेश काढला. हे पुरेसे नसून सर्व विद्यार्थ्यांची पन्नास टक्के फि कमी घ्यावी तसेच मागील वर्षीच्या घेतलेल्या फिचा परतावा द्यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकाव्दारे केली आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन पालक व विद्यार्थ्यांकडे फि भरण्याबाबत तगादा लावणा-या शिक्षण संस्थांवर कडक कायदेशीर कारवाई प्रशासनाने करावी. सद्य स्थितीत ऑनलाईन वर्ग सुरु झाले आहेत. परंतू फि बाकी असणा-या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून ऑनलाईन वर्गाची लिंक पाठवली जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशाही शिक्षण संस्थांवर देखिल कायदेशीर कारवाई मनपा आयुक्तांनी करावी अशीही मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.—

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button