पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यूचे थैमान. अनेक नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल. महापालिका आयुक्त राजेश पाटील. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय, यांनी तातडीने उपाय योजना करण्याची मागणी

संवाददाता,
सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.२३.१०.२०२१.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या डासांचा सुळसुळाट पाहायला मिळात आहे. अनेकदा याला सर्वसामान्य नागरिक तितकाच जबाबदार असल्याने महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याविषयी महापालिका आयुक्त राजेश पाटील,आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. अनिल रॉय, यांनी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेकदा नागरिकांकडून कचरा रस्त्यावर फेकला जात असल्याचे वेळीवेळी निदर्शनास येते त्यामुळे डेंग्यूच्या डासांच्या एक प्रकारे वाढीसाठी खतपाणी घालत आहे बहुदा वाटते. शहरातील अनेक भागात नागरिक यामुळे हैराण झाले, असल्याने महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागांवर प्रचंड ताण पडत आहे नागरिकांना आवाहन करुनही पाण्याची साठवणूक याला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.