महाविकास आघाडी सरकारमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आमदार मा. महेश लांडगे

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२६.१०.२०२१.
पिंपरी महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी द्धेषमुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबाच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास राज्य सरकारांचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कूतीत न आणणाऱ्या या सरकारने आमच्या प्रश्र्नांची जाहीर उत्तरे द्यावीत अन्यथा जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार मा. महेश लांडगे,यांनी केली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रका आमदार लांडगे. यांनी म्हटले आहे की राज्यातील ५५. लाख हेक्टर हुन अधिक शेतजमिनीवरील पिकांचे अतिवृष्टी मुळे नुकसान झाल्याचे सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे, प्रत्यक्षात १००. लाख हेक्टर हुन अधिक शेतजमिनीवरील पिकें पुर्ण नष्ट झाली आहेत आणि पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत.