मराठी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट

मुंबई दि. 14 – भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 129 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज सदिच्छा भेट घेतली.यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर; राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर; सुरेश बारशिंग ; हेमंत रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे राष्ट्र उभारणी चे काम केले आहे. त्यांच्या बद्दल प्रचंड आदर व्यक्त करून देशाप्रती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाची प्रशंसा यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली. यावेळी ना. रामदास आठवले यांनी भीमजयंती निमित्त
बुद्धमूर्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा राज्यपालांना सप्रेम भेट दिली.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राजभवन मध्ये बुद्धमूर्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुष्प वाहून विनम्र अभिवादन केले.
यावेळी झालेल्या चर्चेत राज्यपाल हे राज्याच्या हितासाठी उत्कृष्ट काम करीत आहेत. कोरोनाचे संकट राज्यावर कोसळले असताना राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल यांनी आढावा बैठक घेणे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे.त्यामुळे याबाबत कोणी काही विरोधी वक्तव्य केले असले तरी रिपब्लिकन पक्षाचा राज्यपालांच्या भूमिकेला पाठिंबा आहे असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button